'मध्यमवर्गातल्या त्याच त्याच पात्रांवर तेच तेच प्रसंग रचून सपक लिखाण करण्यात लेखकाचा हात कुणी धरू शकत नाही. यात बिचार्या लेखकाचाही दोष नाही. मध्यमवर्गापलिकडलं अफाट जग बिचार्याने कधी बघितलेलंच नाही. अशा झापडबंद लेखनात मग वाचकाला काय गवसणार?......'
नाही म्हटले तरी ती टीका मला बरीच झोंबली होती. मी माझ्या आयुष्यातल्या अनुभवांवर लिहित होतो. त्यात कुणाचे काय गेले? लेखकाला प्रत्येक तर्हेच्या आयुष्यावर लिहिण्याची काय सक्ती असते की काय? माझे वाचक माझ्या पुस्तकांवर होते ना खूष? तेवढे पुरेसे नव्हते का?
अचानक मनात विचार चमकून गेला. या वेडीवर लिहावे का? घ्या, मध्यमवर्गापल्याडचीच गोष्ट आहे म्हणावं. मी कागद समोर ओढून ओळी खरडायला सुरुवात केली.
"श्रीराम... श्रीराम" बाजूला आवाज आला म्हणून मी मान वळवून बघितलं. मघाचा तो म्हातारा हमाल माझ्याशेजारी येऊन बसला होता. माझं त्याच्याकडे लक्ष आहे असं वाटल्यासारखा तो बोलायला लागला. बरंचसं स्वतःशी आणि काही माझ्याशी...."सायेब तुमी सांगा हे बरं का?.. काहून ही पोरं तिला तरास देत्यात? सगळे माजलेत. राहनार सगळे हितेच. पण ती त्यान्ला काय डिष्टर्ब करत नाई वो. तेच रोज हिला छळणार आनि ही भांडणार. तेपन शिव्या देनार. पण मार कोनाला? हिला... एकदा नाई शेंभरदा सांगितलं, नको त्यांच्या नादी लागत जाऊ. ध्यानात राहील तर ना वो...
काय प्राब्लेम झाला तिचा कुनाला ठावं... मुंबईत होती का काय जनू... हिकडं कुनी आनून टाकलं ठावं न्हाई. आनली तवा बेसुध व्हती ती. जाग आली न् काय झालं कुनाला ठावं! डोस्कं फिरल्यागत झालं तिचं. रडत काय व्हती, मोठ्यानं वरडत काय व्हती... सारखी मुंबईची गाडी कोन्ची? मुंबईची गाडी कोन्ची? गाडी आली की पळत जानार, पन गाडीत चढनार नाय... गाडी निघून गेली की ठेसनावर कपाळ बडवत बोंबलनार. मंग तेबी बंद...आता मुक्यावानी हिंडती, नायतर कोपर्यात बसून असती. फकस्त तिला कुनी वावगं, वंगाळ बोललं की लई खवळती.. लई खवळती... तीपन काय करनार वो?" त्याचा आवाज हळूहळू लहान होत गेला. 'श्रीराम... श्रीराम' फक्त ऐकू येत राहिलं.
संपूर्ण कथा खालील दुव्यावर आहे.
http://vishesh.maayboli.com/node/95
Wednesday, December 31, 2008
Wednesday, July 16, 2008
हेमलकसा.... - चिन्मयचा लेख
बर्याच दिवसांनंतर ब्लॉग उघडूनही लिहिण्यासारखं माझ्याकडे काही नाही. पण हे पोस्ट कुणाच्यातरी प्रचंड कार्यामध्ये माझा खारीचा वाटा म्हणून!
वेळात वेळ काढून हा लेख जरुर वाचा. http://www.maayboli.com/node/2479
लेख आहे हेमलकसा आणि तिथे आमटे कुटुंबीय करत असलेल्या कार्याबद्दल.
हेमलकसाची इतर माहिती, ते कुठे आहे?, कशा प्रकारची परिस्थिती तिथे होती/आहे, तिथल्या आदिवासींपुढले प्रश्न हेही चिन्मयने लेखात सविस्तर लिहिलं आहे. ते वाचलं की, हेमलकसात आमटे कुटुंबियांचं काम किती अवघड आणि किती मोलाचं आहे, हे वेगळं लिहायची गरज उरत नाही.
सगळ्यांत महत्त्वाचं: लेखात म्हटल्याप्रमाणे या प्रकल्पाला आर्थिक मदतीची गरज आहे. हेमलकसाच्या संकेतस्थळाचा दुवा दिलेला आहेच! मदतीचे अनेक हात पुढे यावेत, ही अपेक्षा.
पण त्याआधी, लेख पूर्ण वाचणं महत्त्वाचं! वाचाल ना?

Saturday, May 24, 2008
सती - ९ (शेवट)
........ थोडीफार फळं, डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घेऊन शिशिर घरात शिरला. घरात सर्वत्र भयाण शांतता दाटलेली.... हिवाळ्यातला लहान झालेला दिवस मावळतीला लागलेला. सुधा औषधांच्या गुंगीत गाढ झोपली होती.
.... ' वाढ झालेली नाहीये बाळाची आणि.... ' पुढचं बोलणं त्याला कळलंच नाही.
दोन आठवड्यांपूर्वीची रात्रीची धावपळ त्याला आठवली. रात्री बाराला त्याने सुधाला हॉस्पिटलमध्ये हलवलं होतं. डॉक्टरांनी बाळाबद्दल सांगितलं मात्र... तो मटकन खालीच बसला.
' सुधाला कसं सांभाळू मी डॉक्टर? ती वेडी होईल.... हेल्प मी... माझ्यात बळ नाहीये आता. ' तो डॉक्टरांसमोर ढसाढसा रडायला लागला.
सुधा शुद्धीवर आली तेव्हा तिने आकांत केला....
' आय लॉस्ट माय बेबी, शिशिर... मला जगायचं नाहीये..... मला मरू द्या. डॉक्टर, मला जगायचं नाहीये. डॉक्टरऽऽऽ ' तिला जवळही घ्यायचं त्राण न उरलेला तो डॉक्टर नर्सेसची धावपळ पाहात एका कोपर्यात सुन्न बसून राहिला.....
नुकतंच घरी आणलं होतं त्याने तिला.
' उठली होती का? ' सुधाच्या आईंनी नकारार्थी मान हलवली.
' मी बसतो काहीवेळ तिच्याजवळ... '
' बरं, मी जरा स्वयंपाकाचं बघते. ' त्या उठून बाहेर गेल्या. सुधाच्या डोक्यावरून हात फिरवत तो निःशब्द बसून राहिला.
' ईशानी... ' सुधाचा आवाज ऐकून तो चमकला.
' राणी बरं वाटतंय का? ' तो तिच्या जवळ जाऊन म्हणाला.
कसला भकास दिसत होता सुधाचा चेहरा. विस्कटलेले केस, निर्जीव डोळे...
' काही हवंय का, राणी? '
' तिने आपल्या बाळाला मारलं... ' ती अस्फुट स्वरात म्हणाली.
' अं... ' शिशिरला काहीच अर्थबोध झाला नाही.
' रमा... तिने मारलंय आपल्या बाळाला शिशिर.... तुला समजत कसं नाही? सगळे म्हणत होते ते खरंय. ती आहे... इनामदारांवर लक्ष ठेवून आहे. तिचा अपमान सहन होत नाही तिला... ' एवढ्या बोलण्यानेही तिला धाप लागली.
शिशिरने तिला घट्ट जवळ घेतलं, ' राणी, शांत हो.. हे काय बोलतेयस? तुझी तब्येत नाजूक झालीये खूप... औषध.... '
सुधा स्वतःवरचा ताबा सुटल्यासारखी किंचाळलीच... ' तुला कळत कसं नाहीये शिशिर... तिने... तिनेच... हे घडवून आणलं सगळं.... तिनेच... चल... आत्ताच्या आत्ता आपण टुणकीला जाऊ... प्लीज चल... मला आई व्हायचंय शिशिर... मला आई व्हायचंय... तिच्यासमोर नाक घासेन मी... काय हवं ते करीन.. चल ना... चल ना! ' ती ओक्साबोक्शी रडायला लागली.
.... ' त्यांचं वाढलेलं वय, आधीची काही complications यामुळे हे झालेलं असू शकतं. आत्ता त्यांनी सध्याच्या परिस्थितीतून recover होण्याची गरज आहे. पुढेही योग्य काळजी घेतली तर त्या आई होऊ शकतात. ' डॉक्टरांनी त्याला बरंच समजावून सांगितलं होतं. ते त्याला हळू हळू सुधाला समजावून सांगायचं होतं.
' सुधा... असल्या गोष्टींवर आपला कधीतरी विश्वास होता का राणी? डॉक्टर म्हणाले की काही प्रॉब्लेम्स.... ' त्याचं बोलणं तसंच राहिलं....
' मला तिथं घेऊन चलऽऽऽ.... ' सुधा विचित्र किंचाळली. ' ऐक माझं... मला मूल हवंय! खरा प्रॉब्लेम तुला कळत नाहीये का? नाहीये का कळत? रमा.... कोप... सती.... ' सुधाची शुद्ध हरपली.
बधीर झाल्यासारखा शिशिर तिच्याकडे पाहात तिथेच थिजून बसून राहिला.
समाप्त.

Subscribe to:
Posts (Atom)